मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवू
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे
ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
शासनच्या माध्यमातून ५ हजार १० हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती की जे जेष्ठ नागरिक तीर्थ क्षेत्रांना जाऊ इच्छितात, दर्शन घेऊ इच्छितात त्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही. त्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना सुरु करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाण राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासाठी धोरण ठरवलं जाईल, शासनच्या माध्यमातून ५ हजार १० हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असेल. तर हज यात्रा तर आधीपासून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.