मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला,अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एकनाथ शिंदे यांनी आपली भूमीक स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. ते पुढे म्हणाले की, आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं त्यांनी सांगितलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्व नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात आता महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेते घेतील. भाजप जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले, मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मी आनंदी आहे. मी नाराज नाही, तसेच नाराज होऊन रडणाऱ्यांमधला मी नाही. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असे मी मोदींशी फोनवर बोलून सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.