भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मोठी बातमी: माजी मंत्री एकनाथ खडसे यांचेवर लवकरच मोठी जबाबदारी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंच्या प्रवेशाची चर्चा आता थांबणार असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश लवकरच केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे सध्या दिल्लीत असून भाजपा हायकमांड सोबत त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. दरम्यान भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचार मंथन करण्यात येऊन महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आला. आता यातच एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलेलं असून त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्या मुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय.

लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागलीय. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!