भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात खळबळ, मोठा राजकीय भूकंप होणार?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियावर या गुप्त बैठकीचा फोटो व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना बैठक झाल्याचं मान्य करावं लागलं आहे. पण या भेटीत नेमकी काय राजकीय रणनीती शिजली? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत. माझ्या बंगल्यावर आले, मला भेटायला आले. मंत्रालयात मला भेटायला आले. अशा पद्धतीत कुठेही राजकारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते माझ्याकडे फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते. आमदार संतोष बांगर हे सुद्धा होते. मी दोघांची चर्चा केली. या चर्चेत कोणतंही राजकारण नाही”, असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला. पुढे त्यांनी असाही सांगितलं की, “मी बैठकीत आहे. मी नाही असं बोललोच नाही. मी बसलो. त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या बाबतीत चर्चा झाली. राजकारणाच्या बाबतीत अशी ओपन चर्चा करता येत नाही”, असं सत्तार यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचा एक खासदार वाढवत आहात, अशी चर्चा आहे. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. आपण त्यांना विचारुन घ्या. त्यांना जे जे सोबत आहेत त्यांना सोबत घेतात. आमच्या सारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत जोडण्याचं काम करतो”, अशी सूचक प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. “मुख्यमंत्री आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार यांच्या विकासाच्या मुद्द्यांवर कुठल्याही ठिकाणी कमी पडत नाही. मुख्यमंत्री विकासकामांसाठी योग्य निधी देत आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे अंतिम सत्य आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच शिवसेनेत आलो”, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनीदेखील या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. “मी लोकप्रतिनिधी आहे. मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटावं लागणारच आहे. मला न्याय मंदिरात यावच लागेल. कुणतरी या छोट्या गोष्टीची चर्चा सुरु केली आहे. कुणीतरी खोडासळपणे लपूनछपून फोटो काढलेला आहे. कुठल्यातरी एका कॉर्नरमधून फोटो काढण्यात आलेला आहे. मोदी आमच्या विरोधात आहेत तर मी त्या सभागृहात जायचंच नाही का?”, असा सवाल नागेश पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!