Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

मोठी बातमी : सावदा शहरातून बनावट नोटा जप्त, दोघांना अटक, एक फरार, सावदा पोलिसांची कारवाई

सावदा, ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा शहरात बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली. आज दि. १३ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सपोनी विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठ अधिकारी मा. श्री. महेश्वरी रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल सानप, स फौ संजय देवरे, पोहेका संजीव चौधरी, पोहेका उमेश पाटील पोहेका यशवंत टहाकडे, पोहेका किरण पाटील ,पोना निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापला रचून शीताफिने सावदा शहरात बनवत नोटा बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली.

सावदा शहरातील शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान, दोघे राहणार ख्वाजा नगर, सावदा, तालुका रावेर यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या 76 चरणी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण 37,600/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीताना अटक करण्यात आली आहे तसेच सदर आरोपिताचा सहकारी असलेले एका आरोपीच्या शोधाच्या पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे सावदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

दरम्यान,सावदा परिसरात बनावट नोटा चलनात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील तपास सावदा पोलिस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!