मोठी बातमी : प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात भीषण अग्नितांडव,अनेक तंबू जळून खाक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रयागराज मध्ये महाकुंभमेळा सुरू असून महाकुंभमेळ्यातून एक मोठी बातमी आली आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं असून, दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
महाकुंभ परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागली असून १९ सेक्टर पर्यंत आग पोहचात आहे. काही तंबू जळून खाक झाल्याचं सांगितलं जात आहे. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २० ते २५ तंबू जळून खाक झाले
दरम्यान या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली असली तरी मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी समोर आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की काळजी करण्यासारखे काही नाही. अफवांकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही करण्यात आले आहे.