शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : अग्रिस्टॅक योजने अंतर्गत ओळखपत्र बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे शेतक-यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनामार्फत अग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच ही सुविधा नागरी सुविधा केंद्र (csc) माध्यमातून करण्या बाबतच्या सुचाना देण्यात आल्या आहेत. या बाबतचे परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार (महसूल) महाराष्ट्र शासन मंत्रालय यांनी काढले आहेत.
गावागावातून या बाबत वेळापत्रकानुसार कॅम्प चे आयोजन करण्यात यावे. ग्राम महसूल अधिकारी यांनी नागरी सुविधा केंद्र (csc) चालकांना कॅम्प मध्ये सहभाग सूनीच्छित सूनीच्चित करावा असे परिपत्रकात म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी खातेदार यांना फार्मर आयडी प्राप्त होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होणार आहे त्यांना शासनाकडुन विवीध योजनेचा लाभ जलदगतीने मिळणार आहे. जसे पि.एम. किसान सन्मान योजना, पिक विमा योजना, पिक कर्ज, नुकसान भरपाई अनुदान DBT दवारे वाटप, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती पिकाबदददल सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचा यात सामावेश आहे.
सर्व शेतकरी यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खातेदार यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. फार्मर आयडी करण्याकरिता गावातील तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, CSC चालक यांच्याकडून शेतकरी यांची नोंदणी करुन घ्यावी. या योजनेत नोंदणी करण्याकरीता केवळ आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक शेतकरी आवश्यक आहे. दिनांक २१ जानेवारी पासुन कॅम्पमोड वर सर्व गावात विशेष शिबीरे आयोजीत करण्यात येत असुन सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.