भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : राज्याच्या शालेय पोषण आहारात “या” १५ पदार्थांचा समावेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृती सुधारणा समितीने तज्ञांच्या शिफारशी नुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील या दृष्टीने तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती निश्चित करण्यात आली आहे.

पोषण आहारात पुढील १५ पदार्थांचा शालेय समावेश करण्यात आला आहे-
१. व्हेजिटेबल पुलाव
२. मसाले भात
३. मटार पुलाव
४. मूगडाळ खिचडी
५. चवळी खिचडी
६. चना पुलाव
७. सोयाबीन पुलाव
८. मसुरी पुलाव
९. अंडा पुलाव,
१०. मोड आलेल्या मटकींची उसळ
११. गोड खिचडी
१२. मूग शेवगा वरण-भात
१३. तांदळाची खीर
१४. नाचणीचे सत्त्व
१५. मोड आलेले कडधान्य

काही विद्यार्थी अंडी खात नाहीत म्हणून जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. बचत गटाचे आहार तयार करण्याचे दर निश्चित केले आहेत. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल. राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची. केवळ खिचडी, वरण-भात, उसळ भात अशा मर्यादित खाद्यापदार्थांऐवजी यंदापासून १५ लज्जतदार पदार्थांची चव पोषण आहार योजनेत पात्र असल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या ८६ हजार ५०० शाळांमधील २ कोटी ३ लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!