राजकारणातली मोठी बातमी : शरद पवार व उद्धव ठाकरे भाजप सोबत जाणार, खळबळ जनक दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
देशात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ते पुढे बोलताना बाच्चू कडू म्हणाले की ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून, यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहाता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे . आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे , असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलं आहे.