भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

मोठी बातमी : इराणचा भारतीय जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले. मोठ मोठे हल्ले केली जात आहेत. अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या ठिकाणांवर इराणकडून हल्ला केला जात आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. त्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला.

ओमानच्या सागरी हद्दीत इराणच्या युद्धजन्य कारवायांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर तसेच इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर, इराणने जहाजांवर हल्ले सुरू केले. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली. एका भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. या घटनेत एका भारतीय जहाजावर झालेल्या भयंकर हल्ल्यात किमान तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, एमकेडी व्योम या जहाजावरील तीन भारतीय क्रू सदस्यांचा या हल्ल्यात अंत झाला. सध्या, ओमानी अधिकाऱ्यांच्या मदतीने जहाजावरील अन्य भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

ओमानमधील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली. दूतावासांनी सांगितले की, एमकेडी व्योममधील तीन भारतीयांचा मृत्यु झाला. ओमान प्रशासनाच्या मदतीने आम्ही भारतीयांना बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहोत. एमकेडी व्योम या जहाजावर मारशॅल आयलॅंडचा झेंडा लावलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या जहाजावर भारतीय लोक कामाला होते.

एमकेडी व्योम हे जहाज मार्शल आयलंड्सचा ध्वज फडकवत असून, ते मस्कट बंदरापासून अंदाजे ५२ नॉटिकल मैल अंतरावर होते. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, जहाजावरील उर्वरित २१ क्रू सदस्यांना यशस्वीपणे वाचवण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या भारतीय क्रू सदस्यांच्या निधनाबद्दल ओमानमधील भारतीय दूतावासाने गहन शोक व्यक्त केला आहे. ओमानच्या सरकारी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात जहाजाच्या मुख्य इंजिन कक्षात प्रचंड स्फोट झाला, ज्यामुळे आग भडकली आणि एका क्रू सदस्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, सागरी सुरक्षा केंद्राच्या समन्वयाने, २१ क्रू सदस्यांना पनामा ध्वजांकित एमव्ही सँड नावाच्या व्यावसायिक जहाजाद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यात १६ भारतीय, चार बांगलादेशी आणि एक युक्रेनियन नागरिकाचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!