मोठी बातमी : विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही दिसणार आता गणवेशात
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिक्षण क्षेत्रातून शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूतोवाच केले आहे. ‘ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे. त्या मुळे आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते.nशिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.