मोठी बातमी : शिक्षण श्रेत्रात मोठा भ्रष्टाचार ; जळगाव जिल्ह्यात कोट्यावधींचा शैक्षणिक घोटाळा, बोगस शिक्षक भरती व बोगस पटसंख्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बेकायदेशीर शिक्षकांची भरती, बोगस पटसंख्या दाखऊन शासकीय अनुदान लाटण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडल्याचा मोठा आरोप करण्यात आला असून या बाबत शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधील शाळांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.या संदर्भात मंत्री अनिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांना भेटून चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाईचा आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्यात यावी, ज्यांनी अनुदान लटलेल आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी शालेय कर्मचारी व समाजिक कार्यकर्त्यांची तक्रारदाराची मागणी आहे.
एखादी व्यक्ती शाळा चालवायच्या नावाखाली विकत घेतो, बोगस पटसंख्या दाखवायची ,बोगस शिक्षक भरती करून सगळा पैसा लाटून घ्यायचा संस्था चालकांच्या बोगस सह्या मारायच्या, शासकीय अनुदान लाटून घ्यायच आणि नंतर शाळा सोडून द्यायची असले बोगस प्रकार सुरू आहेत.
असेच प्रकार जळगाव जिल्ह्यात अनेक शाळां मध्ये घडलेले आहे. चौकशीत जळगाव जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच बोगस पटसंख्या दखून शिक्षक भरती करून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार घडले आहेत. याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जळगाव जिल्ह्यातही आता बोगस पटसंख्या व बोगस शिक्षक भरती करून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकारचा मुद्दा एरणीवर आला आहे..