भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! नवीन सरकारच्या स्थापनेला वेग, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री….

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे.या निवडणुकीत भाजप हा १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करण्यासाठी बैठकांचे सत्र चालू झाले आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या कडे राज्याचे लक्ष लागून आहे.

शिवसेना पक्षांच्या नेत्यांना वाटतं एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत. त्या नंतर नव्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने पावलं उचलली जातील. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्‍याच्या निवडीला वेग येईल. असे सांगितलं जातं आहे.

महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याने भाजप नेते मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने मुख्यमंत्री पद भाजपला मिळावं अशी भूमिका भाजप नेत्यांकडून घेतली जात असून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी भूमिका शिवसेना पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नसल्याने शपथविधी कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली असून हा पेच सोडविण्यासाठी दिल्लीहून अमित शहा आज मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आता मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्व राज्याचे लक्ष वेधून लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!