भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मोठी बातमी : शेत रस्त्याच्या नोंदी सात – बारावर इतर हक्कात करण्याचे नवीन नियम, नियमात बदल होणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जमिनीच्या खरेदी विक्री अथवा वाटणी करताना होणाऱ्या दस्त आणि नोंदणीत शेत रस्त्याबाबत कुठलीही स्पस्टता नसल्याने शेत रस्ते हा बऱ्याच ठिकाणी वादाचा विषय बनले आहेत. त्या मुळे शेत रस्त्यांच्या नोंदी सात बारा वरील इतर हक्कात कराव्यात तसेच जमिनीच्या नोंदणी करताना त्यातही रस्त्यांचा उल्लेख सक्तीचा करावा.अशीही मागणी होती. या मागणीची दाखल घेत राज्य शासनाने त्या प्रमाणे निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली.

बैठकीस वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार अभिमन्यू पवार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत.

शेत रस्ते ही शेतीची मूलभूत गरज असल्याने साहेती खरेदी विक्रीच्या नोंदणी दस्त मध्ये नोंद करून सात बारा वरील इतर हक्कात रस्त्याची नोंद करणे बंधनकारक करणे, मामलेदार कायदा आणि कलम १४३ मध्ये सुधारणा करणे, शेत रस्त्यांना क्रमांक व दर्जा देणे, त्यावर देखभाल व दुरुस्तीची तरतूद करणे. आदी विषय यात घेतले जाणार आहेत. याचाही पाठपुरावा सुरू आहेत.

शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते.

थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेप मधी असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!