महाराष्ट्रराजकीय

आताची मोठी बातमी ; मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या ४८ तासात भाजपचा नेता निवडीचा निर्णय होणार असून भाजपचे दोन निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रात येणार आहेत, व नेता निवडीची बैठक २९ तारखेला होणार असल्याची माहितीही सूत्रां कडून मिळत आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची खातीदेखील ठरली आहेत, एकनाथ शिंदे यांचे कडे नगरविकास तर अजित पवार यांच्या कडे अर्थ खातं असणार, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.

पुढच्या ४८ तासात राज्यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!