क्राईममहाराष्ट्र

आताची मोठी बातमी : खा संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवत १५ दिवसांचा तुरुंगवास व २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

संयज राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या सहभागी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांच्या या आरोपा विरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आता संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना १५ दिवसांची कैद सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!