मोठी बातमी : केवळ २०० रुपयांत होणार आता जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप – सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |नराज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता केवळ दोनशे रुपयांत जमिनीची हिस्सेवाटप मोजणी करता येणार आहे. यातया संदर्भातील घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. २०० रुपये शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूलमंत्र्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आठवशेतीची, जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप कमी खर्चात होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.नया निर्णयाची माहिती देताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हाच या निर्णयामागचा उद्देश आहे.
पूर्वी हिस्से मोजणी शुल्क जवळपास एक ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते. परंतु, हा खर्च अत्यंत कमी करण्यात आला आहे. केवळ २०० रुपयांत आता मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना, तसेच शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
३ प्रकार आहेत जमीन मोजणीचे
१) साधी मोजणी : साधी जमिनीची मोजणी
करण्यासाठी साधारणतः सहा महिने लागतात. यासाठी सरकारला एक हजार रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागते.
२) तातडीची मोजणी आपल्या जमिनीची
मोजणी तातडीने करण्यासाठी ही तीन महिन्यांची असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया आहे. यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला दोन हजार रुपयांचे मोजणी शुल्क भरावे लागते.
३) अतितातडीची मोजणी : यात दोन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते. यासाठीचे मोजणी शुल्क तीन हजार रुपये आहे.
आता फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा