मोठी बातमी : मालमत्तेची नोंदणी करता येणार आता कोणत्याही सह दुय्यम निबंधक कार्यालयात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या नुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील नागरिकांसाठी सोईचे व्हावे म्हणून व मालमत्ता नोंदणी अधिक सुलभ व्हावी म्हणून जळगाव जिल्ह्यातील मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.
नोंदणी अधिनियम १९०८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार (क्रमांक EST-२०२५ /४६६/C.R.१३९/ M १, दिनांक ३० एप्रिल २०२५), जळगाव जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालयांना संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालये म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
आता ३० एप्रिल २०२५ पासून जिल्ह्यात नवीन ‘संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालये’ कार्यान्वित झालेली असल्याने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही सह दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी तालुका, जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपल्या सोयीनुसार जिल्ह्यातील कोणत्याही निबंधक कार्यालयात जाऊन ते नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
या संदर्भात सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयाने नागरिकांची श्रमाची वेळेची बचत होणार असून नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान सुलभ आणि सोयीस्कर होईल,