Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी : घडामोडींना वेग, ४० बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रिपदाची
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.

महायुती तब्बल २३१ जागा मिळवत बहुमत मिळविले आहे त्यात भाजप १३२ जागा मिळवत राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे. उमेदवार निवडून आले. १३२ उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या असून विरोधी महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ ५०  जागाच जिंकता आल्या आहेत.

आता मुख्यमंत्री,व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कोणाला कोणतं खातं देण्यात येणार ? भाजप व मित्र पक्षांना किती जागा मिळणार या कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होते. परंतु आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनापूर्वी अधिवेशनाच्या पूरवसंध्येला १५ तारखेला दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी नागपुरात घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच नागपूर मध्ये शपथविधी पार पडणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी सांगितले. १५ तारखेला दुपारी ३ वाजता नागपूर मध्ये  मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!