मोठी बातमी : दुय्यम निबंधक दस्त नोंदणीसाठी पैसे घेत असतांनाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l दस्त नोंदणी कार्यालयात निबंधक दस्त नोंदणीचे पैसे घेत असल्याचं व्हडियो समोर आला आहे. य मुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागात मोठा काळा बाजार होत असल्याचं उघड झालं आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून पुण्यातील हवेली चे सह. निबंधक हनुमंत चव्हाण हे नोंदणी साठी उघडपणे पैसे घेऊन नोंदणी करतात. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा सह.निबंध हनुमंत चव्हाण नोंदणी करण्यासाठी पैसे घेत असल्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने या खात्याचे वरिष्ठ अधिकारी व महसूल मंत्री आता काय भूमिका घेतात या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा भ्रष्टाचार कुणाच्या पाठिंब्याने केला जातं आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.