मोठी बातमी : जीर्ण झाडाच्या नावाखाली हिरव्या डोलेदार झाडाची कत्तल, अधिकाऱ्यांनी दिली अजब परवानगी
सावदा – फैजपूर रस्त्यावरील प्रकार, दोन झाडे लावा ,एक झाड तोडा
सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा – फैजपूर रस्त्यावर फार्मसी कॉलेज समोर हिरवेगार डोलेदार लिंबाचे झाड जीर्ण झाल्याचे दाखवून सर्रास झाड तोडण्यात आले आहे. झाड शेकडो वर्षांपूर्वीचे असून जवळ जवळ १०० ते १२५ फुटाचे हे झाड आहे.
सावदा फैजपूर रोडवर फार्मसी कॉलेज समोरील मेरिडियन प्लाझा समोरील नीम झाड जीर्ण झाल्याचे दाखवून तोडण्याची परवानगी वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांचे कडे मागण्यात आली होती.
वन विभागाची अजब परवानगी
मेरिडियन प्लाझा हॉटेल समोरील जीर्ण झाड तोडण्याची परवानगी या अटीवर देण्यात आली आहे. त्यात एक झाड तोडा परंतु त्या बदल्यात नवीन दोन झाडे त्यांचे संगोपन करावे. संगोपन न केल्यास वनविभागामार्फत दंड आकारण्यात येईल. अशी अजब प्रकारे परवानगी स्व. शो. म. फटांगरे , वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
सदरील नीम झाड हे रस्त्याला लागून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवेगार झाड तोडण्याची संमती दिली काय? शेकडो वर्षांपासून उभे असलेले झाड कुठलेही जीर्ण नसताना हिरवेगार मोठे झाड असताना कुठलेही ठोस कारण नसताना या झाडाला तोडण्याला वन विभागाने परवानगी कशी दिली.