मोठी बातमी : तुम्ही “सपट” कंपनीचा चहा पितायं थांबा? ‘सपट’ कंपनीच्या चहा पावडर मध्ये आढळली कीटकनाशके
पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l तुम्ही सपट कंपनीचा चहा पिताय, सावध व्हा? आपण रोज घेत असलेल्या चहाची पावडर किती सुरक्षित आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चहा मधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या सपट कंपनीच्या चहा पावडरमध्ये कीटकनाशकं आढळली आहेत. अन्न आणि औषध गुप्तवार्ता विभागाच्या कारवाईमध्ये कीटकनाशके आढळली. सपट चहाच्या डेपोवर राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकत मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे.
जवळपास साडे चौदा लाखांचा मालही जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सपाट कंपनीच्या चहा पावडर वर कारवाई केली आहे
सपट चहामध्ये मोठया प्रमाणावर कीटकनाशकं असल्याचे संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने सपट चहाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सपट चहाचे सहयाद्री कडक, सहयाद्री इलायची, सपट हॉटेल डस्ट आणि सपट परिवार फॅमिली मिक्स या अन्न पदार्थामध्ये कीटकनाशकाचं प्रमाण जास्त आढळले. त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
कंपनीने लाँच केलेला सपत चाय हा पहिलाच प्रीमियम डस्ट टी ११९ वर्षांचा वारसा आहे. सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या, सपत चाहाचा महाराष्ट्रातील प्रीमियम डस्ट टी मार्केटमध्ये सर्वाधिक वाटा आहे.
या ठिकाणी टाकल्या धाडी
१) या धाडसत्राअंतर्गत पुणे येथील सपट इंटरनॅशनल प्रा. लि. वडकी येथे गुप्तवार्ता विभागाचे अधिका-यांचे पथकाने छापा टाकत सपट चहाचा सुमारे १४ लाख ६० हजार ८५० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
२) औरंगाबाद येथे डब्ल्यू १७, वाळूंज एमआयडीसी येथील कंपनीच्या डेपोवर छापा टाकत सुमारे १२ लाख १५ हजार ३६० रूपये किंमतीचा सहयाद्री कडक, सहयाद्री इलायची, परिवार फॅमिली ब्लेंड आणि सहयाद्री हॉटेल डस्ट या चहाचा साठा जप्त करण्यात आला.
३) सातारा येथील मे. महालक्ष्मी टेडींग शाहुपरी या पेढीवर छापा घालुन सपट चहाचा सुमारे ३६ हजार १२० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला
४) कोल्हापूर येथील श्री बालाजी एजन्सी, गडहिंग्लज या पेढीवर घेण्यांत आलेल्या कारवाई मध्ये चहाचा सुमारे १ लाख ४१ हजार २६० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
हे सर्व नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा