मोठी बातमी : पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास झाल्यास त्याच वर्गात बसावे लागणार… काय आहे केंद्र सरकारचं नवीन धोरण
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पाचवी व आठवीचे विद्यार्थ्यां व पालकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पाचवी आणि आठवीतल्या ढकलगाडीला यापुढे ब्रेक लागणार असूननकेंद्र सरकारनं या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरणं रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पाचवी आणि आठवीतल्या ढकलगाडीला यापुढे ब्रेक लागणार आहे. त्यासंदर्भात आरटीई कायद्यात बदल करण्यात आले आहेत. पाचवी आणि आठवीत नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा घेण्यासंदर्भात धोरण आखण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहे. त्यामध्येही जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला त्याच वर्गात बसावं लागणार आहे. असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. दरम्यान, अपयशी विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये याची योग्य ती काळजी घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत सरककट पास करण्याचा राज्य शासनाचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत पास होणं बंधनकारक असेल.
शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या आधी पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नापास करू नये असा नियम करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्याची परीक्षेत पास होण्याइतपत गुण नसतील तर त्याला नापास करता येणार आहे. पण अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली आहे.
पुढच्या वर्गात जाण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या दोन महिन्यात फेरपरीक्षा देता येणार आहे. त्या परीक्षेतही नापास झाल्यास त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे. आरटीई कायदानुसार, कोणत्याही मुलाची इयत्ता आठवी पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही.
मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी पाचवी किंवा आठवीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.
RTE कायद्यामध्ये ‘नो-डिटेन्शन पॉलिसी’चा समावेश करण्यात आला होता. त्या अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुले परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्याच वर्गात न ठेवता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जायचा. म्हणजे आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला अनेक राज्यांनी विरोध केला होता. २०१५ मध्ये झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळात (CABE) २८ पैकी २३राज्यांनी हे धोरण रद्द करण्याची मागणी केली होती.
काय आहे नवी अधिसूचना ?
विद्यार्थी
- इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश देण्यात येईल. पण पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षा, मूल्यमापन याची कार्यपध्दती निश्चित करेल.
- जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही तर अश्या विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी शिक्षकांकडून अधिकचे मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांच्या आता पुर्नपरीक्षा घेतली जाईल.
- जर विद्यार्थी पुर्नपरीक्षेतही नापास झाले तर पाचवी किंवा आठवीच्या वर्गात अश्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाईल.
- प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.