मोठी बातमी : यशश्री हत्याकांडातील नराधम मारेकऱ्याला अखेर पोलिसांनी केली अटक
नवी मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीचा नवी मुंबईत तीन दिवसांपूर्वी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशश्रीची हत्या केल्याचा आरोप असून त्याचा पोलिस कसून शोध घेत असताना अखेर पोलिसांनी दाऊद शेख याला बेड्या ठोकल्या.
यशश्री गुरुवार पासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. त्यात यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याचं उघड झालं. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशश्रीची हत्या केल्याचा आरोप आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस आरोपींच्या मागावर असून त्याचा शोध घेत आहेत. अखेर दाऊद शेख याला कर्नाटकच्या शाहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून ताब्यात घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.आता त्याला कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जात आहे.
दरम्यान, मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेला दाऊद शेख हा उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता.आणि याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यात त्याला सहा महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. आणि याचाच वचपा काढण्यासाठी त्याने पुन्हा मुलीशी संपर्क साधून हा भयानक प्रकार उघडकीस आला.एकतर्फी प्रेमातून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला निर्दयीपणे अक्षरशः हालहाल करून तिची हत्या केल्याचं समोर आलं.