मोठी बातमी : उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेचे २२ संभाव्य उमेदवार ठरले? यांची आहेत नावे..
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी १४ जागा जिंकल्या होत्या. राज्यातील एकूण जागांपैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. मात्र पक्ष फुटी नंतर मोठा गट एकनाथ शिंदे सोबत गेल्याने ठाकरे साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
महा विकास आघाडीचे अजून जागावाटप झालेले नसल तरी सर्व पक्ष आपापली संभाव्य यादी तयार करीत असून मुंबई आमचा बालेकिल्ला असल्याचं शिवसेना वेळोवेळी सांगत असताना ठाकरे शिवसेनेच्या २२ संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमदेवार
- विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे
- विनोद घोसाळकर : दहिसर
- सुनिल प्रभू : दिंडोशी
- अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी
- ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम
- राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा
- वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व
- विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम
- अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी
- आदित्य ठाकरे : वरळी
- किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा
- ईश्वर तायडे : चांदीवली
- अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर
- रमेश कोरगांवकर : भांडुप
- सुनिल राऊत : विक्रोळी
- संजय पोतनीस : कलिना
- विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर
- सुरेश पाटील : घाटकोपर
- प्रविणा मोरजकर : कुर्ला
- निरव बारोट : चारकोप
- समीर देसाई : गोरेगाव
- श्रद्धा जाधव : वडाळा