मोठी बातमी! सरकारची “लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार ?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.क महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करणार आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
२१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना येत्या १४ आगष्ट ला सरकारच्या तिजोरीतून १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.मात्र त्या पूर्वीच नवी मुंबई मधील चार्टर्ड अकाऊंटट नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. लाडकी बहिण योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्य असून सरकारी तिजोरीतून जाणऱ्या पहिल्या हफ्त्याला तात्काळ स्थगीती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र कोर्टानं लाडकी बहिण योजनेला तातडीची स्थगिती देण्यास नकार दिला आहे.आणि या प्रकरणी पुढील सुनावणी ६ सप्टेंबर मंगळवार रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.