नशिराबाद टोल नाक्यावर मोठा झोल; बोगस पावत्यांंची पोलखोल, दोन मशिन जप्त !
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : नशिराबाद टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आला असून टोल नाक्यावर बनावट पावती देणार्या मशिन्स जप्त करण्यात आल्याने सदरील कारवाई मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रार पात्र झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- १५०० दिले तर कोर्टात गेले, आता सांगताय लाडक्या बहिणीला आम्ही ३ हजार देऊ, लबाडांवर विश्वास ठेवू नका : आ. चित्रा वाघ
- मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या– शरद पवार
- केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सव १५ नोव्हें पासून
राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू असून काही काम रखडले असल्याने अपूर्ण आहे. मात्र, महामार्गावर नशिराबादजवळ टोलनाका उभारण्यात आला असून टोल आकारणी देखील सुरू झाली आहे. या टोल नाक्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी टोल नाक्यावर नकली पावत्या देऊन टोल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी लागलीच रात्री १० वाजता माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्यासोबत पोलीस पथकाने टोलनाक्यावर छापा मारला यावेळी टोल नाक्यावर पथकाला तपासणीमध्ये नियमीत मशिन्सच्या व्यतिरक्ति नोंद न करता नकली पावती काढणारे दोन मशीन आढळून आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.