राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी: भाजप व शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप व शरद पवारांच्या वरिष्ठ नेत्यांची गौतम अदानींच्या घरी बैठक झाली त्यात चर्चा करण्यात आली .त्यात आगामी काळातील निवडणुका व राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची भूमिका या बद्दल चर्चा झाली. राष्ट्रवादी मध्ये सध्या दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मते आपण सरकारमध्ये सामील होऊन भाजप सोबत सत्तेत जावं .तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सह सत्तेत जावं असं दुसऱ्या गटाची मागणी आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते व अजित पवार व त्यांच्या गटाचे नेते यांच्या होत असलेल्या भेटी गाठीना महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्या मार्फत ही बोलणी सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटी, अशा अनेक घडामोडी घडत असून येणाऱ्या आगामी काळात शरद पवारांच्या गटात वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आगामी काळात शरद पवार गट सत्तेत सामील होतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.