भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ग्रामपंचायतींच्या कामाला शिस्त लावण्यासाठी ग्रामसेवकांना आता बायोमॅट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. याबद्दलच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या आहेत.

राज्यातील ग्रामसेवकांना आता बायोमॅट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातल्या सूचना आता पुन्हा एकदा जारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी राज्यसरकारने ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी लागू करण्याचा हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे. यात ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रिक प्रणालितून घेण्याचा आग्रह घेण्यात आला आहे. विधीमंडळात ग्रामविकासाबाबत झालेल्या चर्चेतून जिल्हा परिषदांकडून ग्रामसेवकांच्या हजेरी बाबत माहितीसुद्धा मागवण्यात आलेली होती. त्यामुळे आता ग्रामसेवकांना सुद्धा बायोमॅट्रिक हजेरी लावणं बंधनकारक आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!