भाजप शहराध्यक्ष तथा गोरक्षक हल्ला प्रकरण; १४ आरोपीना अटक, पोलीस कोठडीत पुन्हा वाढ !
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा| सावदा येथील कत्तलखान्याजवळ गोरक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपा शहराध्यक्ष सह पाच जण जखमी झाले होते यात आता पर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टात हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
सावदा येथे दि.२८ नोव्हेंबरला समाजकंटक गो-तस्करांनी गोरक्षक भाजपा शहराध्यक्ष जे के भारंबे सह आणखी चार जणांवर तलवार, बंदूक, लोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला केला या बाबत सावदा पोलिस स्टेशनला ४० जणांवर या प्रकरणी जमावाच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच आर्म ऍक्ट ३/२५ व ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पैकी आतापर्यंत १४ आरोपींस अटक करण्यात आली आहे
या मध्ये शेख बिलाल शेख अयुब कुरेशी, वय-३३, रा.सावदा, शेख कादीर शेख अयुब कुरेशी, वय-२३, रा.सावदा मांगवाडा, शेख साबीर उर्फ बुढा शेख लाल, वय-३९ रा.इस्लामपुरा सावदा, शेख इकबाल शेख गफ्फार, वय-३६ रा.सावदा, शेख आबीद शेख लतीफ, वय-३० रा.सावदा, रमजानखान उर्फ तासीफखान महेबुबखान, वय-२६ रा.सावदा, शेख शाहबाज शेख जमील, वय-२५ रा.सावदा, शेख मुक्तार शेख अरमान, बय-३४ रा.सावदा, शेख कलीम शेख अयुब, वय-३४, अशफाकखान उर्फ अबु असलमखान वय २१ रा खाजानगर, मोईन उर्फ मोयालाला शेख हसन, वय-२७, रा.खाजानगर, शेख साबीर उर्फ अल्लारखा शेख खलील, वय-३४, रा.चांदणीचौक, मुजम्मीलखान अजगरखान, वय-२२, रा.खाजानगर, शेख हैदर शेख मंजूर, मोठा आखाडा, या १४ आरोपींना अटक करण्यात आली त्यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.