मुलीच्या पराभवामागे जामनेरवाला यात तत्थ्य नाही : मतदारसंघ कधीच सुरक्षित नव्हता : गिरीश महाजनांचे खडसेंच्या आरोपावर प्रतिउत्तर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, (निशाद साळवे) मंडे टू मंडे वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री खडसे व महाजन यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फ़ैरी झडत आहेत त्यात आता खडसेंनी थेट गिरीश महाजन यांच्या लक्ष करत माझ्या मुलीच्या पराभवाला जामनेरवाला कारणीभूत आहे. असे म्हणत राजकारणात खळबळ उडवून दिली होती या खडसे यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. खरे तर एकनाथ खडसेंचा मतदारसंघ त्यांच्यासाठी कधीच सुरक्षीत नव्हता. असे का होते, हे त्यांनाच माहित. मात्र त्यांना निवडणूकीत मी पाडले असा ते आरोप करतात. मी त्यांना पाडले हे कळायला सुद्धा त्यांना दोन वर्षे लागली? असा प्रश्न भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.
महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या पराभवाला जामनेरवाला कारणीभूत आहे. असे खडसे म्हणतात परंतु, एकनाथ खडसे यापूर्वी साडे सात हजार मतांनी निवडून आले होते. त्यानंतर एकदा १२०० मतांनी निवडून आले होते. यावेळेला ते पडले. त्यांचा मतदारसंघ एव्हढा सुरक्षीत देखील नव्हता. त्याचे कारण त्यांनाच माहिती असेल. मात्र खुप जनमत त्यांच्या पाठीशी होते. खुप मतांनी ते निवडून येत आहे. त्यांच्यामागे खुप जनमत होते असं कधीही नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. ते रोजच माझ्यावर आरोप करीत असतात. आज कोणता आरोप केला मला माहिती नाही. मात्र त्यांच्या मुलीच्या पराभवामागे जामनेरवाला
आहे. या त्यांच्या म्हनण्यात तत्थ्य नाही. यावेळेला ते निवडणूकीत पडले त्याला कोणालाही दोष देऊन उपयोग नाही. कधी म्हणता फडणवीस यांनी पाडले. कधी म्हणतात मी पाडले. मी तर चार महिने माझ्या मतदारसंघात देखील पाय ठेवला नव्हता. आपण पडलो त्याचा दोष कोणाला तरी देण्यासाठी कींवा आपण पराभूत झालो याचे कारण त्यांना दोन वर्षांनी कळाले,की त्यांना मी पाडले. हे दुर्दैव आहे.
आपण बघतो, राज्यातील अनेक सहकारी बँका आहेत, त्यांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. त्या डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे, की जळगाव जिल्ह्याची बॅंक ही शेतकऱ्यांची बँक आहे. सहकारी संस्था आहे. त्यामुळे त्यात कुठेही राजकारण न करता ती उर्जीतावस्थेत आणावे. त्या व्यवस्थीत व चांगल्या चालल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात नव्वद टक्के काम झाले आहे. येत्या एक दोन दिवसांत जळगाव जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करू.