भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडें, विनोद तावडेंचा समावेश !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास ८ महिन्यांनी जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे.
गेल्या वर्षी निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त सातत्याने येत होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आलेलं होतं. मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण १३ जणांना नॅशनल सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रालते ४ नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत.
याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे. तर नाराज भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.