सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना मंडळाधिकाऱ्याला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव कमी करून आईचे नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंप्राळा येथील किरण खंडू बाविस्कर या मंडळाधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात राहिवाशी असून सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात दि. १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजाराची लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी २७ मे रोजी जळगाव येथील जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कार्यालयात येवून तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरूवारी दि. ६ जून रोजी सापळा रचून मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर. वय-४७, रा. पिंप्राळा, जळगाव. हे ५ हजारांची लाच घेत असतांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.