बोदवड तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बोदवड,ता.बोदवड,मंडे टू मंडे प्रतिनिधी। तालुक्यातील गौरगरिब नागरिकांसाठी कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडून महाराजस्व अभियानांतर्गत दि.१४ रोजी पासून ते दि.१७ रोजी पर्यंत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रभर बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागांमधून तहसील कार्यालय तसेच इतर कामे करण्यासाठी गौरगरीब नागरिकांना येण्या-जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे व तसेच संबंधित काही कर्मचाऱ्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वारंवार रेशनकार्ड साठी चकरा माराव्या लागत होत्या,पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून नागरिकांचे शिधापत्रिकाचे काम वेगाने करण्याचे तोंडी आदेश दिले होते. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी पदभार स्विकारल्यानंतर ही बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आल्याने शासन आपल्या दारी या संकल्पनामुळे गौरगरिब नागरिकांच्या समस्या खुप वर्षापासुन प्रलंबित असलेल्यामुळे त्या लवकरात लवकर मार्गी लागतील यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांकडून तहसीलदार यांचे कौतुक केले जात आहे,व असे तहसीलदार तालुक्याला मिळाले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जाते.