नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक यांच्या गैरप्रकारबाबत आज उपोषण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बोदवड ता.बोदवड,मंडे टू मंडे वृत्तसेवा। बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये त्यांचे वडिल बाबुराव लक्ष्मण निकम यांच्या नावे असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान लाटले आहे.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी दि.०४ ऑक्टोबर २०२१ रोजी गौतम बाबुराव निकम यांनी सन २०१२-२०१३ व बाबुराव लक्ष्मण निकम यांनी सन २०१५-२०१६ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते परंतु निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ पैकी ९० आर मध्ये १ विहीर खोदकाम व बांधकाम न करता शासनाचा निधी लाटला आहे अशी तक्रार दाखल केली होती,
संबंधित अधिकारी यांनी चौकशी व कारवाई न केल्याने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण दि.०१ रोजी बसलेले आहे.
सदर लाभार्थी गौतम बाबुराव निकम हे नांदगाव येथे ग्राम रोजगार सेवक असून त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून विहिरीचे लाभामध्ये गैरप्रकार केलेला आहे तरी संबंधित लाभार्थीवर कारवाई व शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुकाध्यक्ष चेतन पाटील व संघटक गजानन पाटील यांनी केले आहे.