धक्कादायक ; चारीत्र्यावर संशय घेणार्या पतीचा पत्नीनेच केला खून
बोदवड, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणार्या पतीचा संशयाला कंटाळून पत्नीनेच खून केला. आशा दगडू सुरवाडे या आरोपी पत्नीने तिचा पती दगडू पुंडलिक सुरवाडे, पाचदेवडी, ता.बोदवड.यांच्या डोक्यावर विळ्याने सपासप वार करीत खून केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यात घडली.
मिळालेली माहिती अशी की,बोदवड तालुक्यातील पाचदेवडी गावात दगडू सुरवाडे हे शेतकरी त्यांची पत्नी आशा व मुलगी रोशनी वय १७ वर्षे हे कुटुंब राहत असता दगडू सुरवाडे यांना दारूचे व्यसन असल्याने ते त्यांची पत्नी आशा हिच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत वाद करीत असल्याने त्यांच्या या नेहमीच्या वादास त्यांचे कुटुंब वैतागले होते.
यातच रविवारी संध्याकाळी देखील दगडू सुरवाडे हे शेतातून घरी आल्यानंतर गावात जाऊन पुन्हा दारू पिऊन घरी आलेवर पुन्हा त्यांनी दारूच्या नशेत पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला. असाच वाद विकोपाला गेल्याने त्यांची पत्नी आशा सुरवाडे यांनी घरातील धारदार विळा काढून दगडू सुरवाडे यांच्या डोक्यावर सपासप वार केले. घरातील आरडा-ओरड होत असल्याचे पाहून गल्लीतील लोक जमा झाले. सदरची घटना पोलिसांना माहिती होताच पोलीस घटनास्थळी धाव घेत मुलगी रोशनी हिच्या तक्रारीवरून वडिलांचा खून केल्याप्रकरणी आई आशाबाई सुरवाडे विरोधात वरणगाव पोलिसस्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आशा सुरवाडे हिस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहा.पोलिस उपनिरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकारी करीत आहेत.