Breaking : बोदवड तहसीलदारासह चौघे लाच घेताना रंगेहात सीबीच्या जाळ्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात सापडले असून लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून हादरले आहे.
मिळालेली माहिती अशी, अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैश्यांची मागणी तक्रारदार यांच्या कडे केल्याची मिळत असून वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची पडताळणीसाठी जळगावच्या एसीबीच्या पथकाने सापळा रचत रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
यावेळी बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, त्यांचा वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या एसीबीच्या पथकाने आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने मोठा मासा गळाला लागला आहे. सदरील कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तहसील कार्यालयाचे तहसीलदार टोनपे लाच प्रकरणात अडकल्याने संपूर्ण महसूल प्रशासन हादरले आहे. बोदवड तहसीलदारां वर एसीबी च्या झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.