बोदवड मध्ये टेंडरच्या वादातून नगरसेवकामध्ये धक्काबुक्की तणावाचे वातावरण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/प्रतिनिधी: येथील नगरपंचायतमध्ये टेंडरच्या घेण्याचा वादातून नगरसेवकच एकमेकांना भिडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या बाबत चर्चेला उधाण आले असून. मलिद्या लाटण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वत्र याबाबत चर्चा सुरू आहे.
मिळाली अधिक महिती अशी की, २ कोटी ४० लाख रूपयांचे बोदवड नगरपंचायत स्मशानभूमिच्या सुशोभीकरणासाठी निविदा काढण्यात आली ही निविदा आपल्याच समर्थकाला मिळावी यासाठी काही नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची आधीही चर्चा रंगली होती. सदरील टेंडर मध्ये मूळ रकमेच्या ११, १७, १९ व २१ % कमी मूल्याच्या निविदा भरण्यात आल्या. परिणामी नियमानुसार २१ % कमी रक्कम असणार्या ठेकेदाराची निविदा संमत करण्यात आली. यानंतर नगरसेवकांच्या एका गटामध्ये प्रचंड वाद उद्भवल्याने एकमेकांना पकडून धक्काबुक्की केल्यामुळे नगरपंचायतीच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाल्याने हा सम्पूर्ण प्रकार मुख्याधिकारी याच्या गैरहजेरीत घडला, हा संपूर्ण गोंधळ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.