बोदवळराजकीय

बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे वर्चस्व ! ….तर आ. गिरीश महाजनांचे चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार !

बोदवड, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : येथील नगरपंचायतीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले असून नगराध्यक्षा पदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या माध्यमातून नगरपंचायतीवर भगवा फडकला आहे. विषेश म्हणजे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना येथे मात्र भाजपने विकाच्या मुद्यावर सेने सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आ. गिरीश महाजन यांचे चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले असून मतदारसंघातील आगामी निवडणुकीतील नव्या समीकरणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील बहुचर्चित ठरलेले बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९ जानेवारीला लागलेल्या निकालात शिवसेनेने १७ पैकी ९ जागां जिंकत बहुमताचा आकडा गाठला होता. यानंतर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती. नगराध्यक्षपदासाठी सईद बागवान आणि आनंदा पाटील यांच्या नावांची चर्चा असतांना आनंदा पाटील यांचा पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाफर शेख आणि योगीता खेवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र, शेवटच्या दिवशी जाफर शेख यांनी अर्ज मागे घेतला. भाजपच्या एकमेव नगरसेवकाने सेनेला पाठिंबा दिल्याचे आधीच सांगितले होते. यामुळे नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या योगीता खेवलकर यांच्यात लढत झाली. यात शिवसेनेचे आनंदा पाटील यांना १० तर राष्ट्रवादीच्या योगीता खेवलकर यांना ७ मते मिळाली. यामुळे बोदवडच्या नगराध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे रेखा संजय गायकवाड यांनी निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा होताच सभागृहाच्या बाहेर शिवसेनेने जोरदार जल्लोष करून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!