हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेला जंगलातील मारोती येथे गुराख्यांचा आगळा वेगळा उपक्रम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
बोदवड ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। बोदवड तालुक्यातील वराड मुक्तळ भानखेडा साळशिंगी शिवारातील जंगलात असलेले मारुतीचे प्राचीन देवस्थान येथे वराड येथील गुरे चरणाऱ्या भाविकांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे त्यांनी संपूर्ण गावाला जंगलातील मारुती येथे जेवणाचा कार्यक्रम राबविला हे देवस्थान अत्यंत प्राचीन असून गेल्या कित्येक वर्षा पासून तालुक्यातील भाविक वन परिक्षेत्रात गेले असता या मारुतीचे दर्शन घेत असतात तसेच किती ही दुष्काळ पडला तरी मारोती मंदिरा मागील तळ्यातील पाणी कधीच आटत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे…. तसेच आज गावातील काही गुरे चारणाऱ्या तरुणांनी येथे. देवाला नवस देऊन साकळ घातले ते असे की देवा आमच्या गुरांकरी ता नेहमी आपला जंगल सुजलाम सुफलाम राहू दे आणि संपूर्ण गावाला जेवणाचा कार्यक्रम राबविला……
या वेळी गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केले गावातील प्रगतिशील शेतकरी कैलास जुलालसिंग पाटील विकास सिंग पाटील यांनी जंगलात आपले ट्रॅक्टर पाठवून भाविकांना ये जा करण्यास मदत केली तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील सुपडू मोजे, गणेश बेलदार, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, गोपाल मोझे,विनोद मोझे ,राजेंद्र मोरे,गोलू मोरे , ईश्वर पाटील, जयराज वाघ ,अमोल मोझे इत्यादी भाविकांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले त्यामुळे सर्वांस गावाच्या वतीने कौतुक होत आहे सदरील गुराखी दर वर्षी कार्यक्रम राबविणार आहे असे त्यांनी सांगितले आहे