यावल तालुक्यातील अकलूज गावाजवळ ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह
पाडळसे, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज l प्रतिनिधी -सुरज सपकाळे – यावल तालुक्यातील अकलूज या गावाजवळील देशमुख प्लॉट परिसर आहे या परिसरात एक अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला सदर प्रकारा शुक्रवारी निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली फैजपूर पोलिसांनी यावर ग्रामीण रुग्णालयात आणला असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की अकलूज तालुका यावल या गावा जवळ शेत शिवार शिवारात देशमुख प्लॉट परिसर आहे या भागातून संदीप सुनील महाजन राहणार पिळोदा बुद्रुक हे ट्रॅक्टर घेऊन जात होते तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात एक अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह दिसून आला तेव्हा त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी या ठिकाणी पोलीस कर्मचारी मोती पवार, विकास सोनवणे, विजय परदेशी, गुलबक्ष तडवी, या पथकास पाठवले व त्यांनी पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला मयत याचे अंगावर एक जीन्सची पॅन्ट होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करीत आहे