बोगस शालार्थ आयडी घोटाळा : ६८० बोगस शिक्षकांना होणार अटक?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा भूकंप घडवणारा शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून बनावट ओळखपत्रांच्या आधारे तब्बल १ हजार ८० हून अधिक बोगस शिक्षकांनी शाळांमध्ये नोकऱ्या मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पैकी ६८० बोगस शिक्षकांवर कारवाई होणार असून त्यांना अटक करण्याचे संकेत मिळत आहेत.
हे प्रकरण उघळकीस आल्याने शैक्षणिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शिक्षण क्षेत्रातील हा घोटाळा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून, या घोटाळ्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून या मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षणाचा दर्जा धोक्यात आला आहे.हा घोटाळा म्हणजे फक्त आर्थिक फसवणूकच नाही, तर शैक्षणिक मूल्यांवर हल्ला आहे, या घोटाळ्याने केवळ शिक्षकांच्या नियुक्तीच नव्हे, तर पगारातून टक्केवारी वसूल करणाऱ्या भ्रष्टाचाराच्या साखळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
१ हजार ८० शालार्थ आयडीं पैकी ६८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून
उघड झाले असल्याने (एसआयटी) विशेष तपास पथकाने या सर्व बोगस शिक्षकांना अटक करण्याचे संकेत दिले असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवणाऱ्या या शिक्षकांनी भ्रष्टाचाराची साखळी तयार केली असून या साकळीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी आणि कर्मचारी सामील असल्याचा संशय असून गेल्या पाच महिन्यांपासून हा घोटाळा चर्चेत आहे.
१२ मार्च रोजी सायबर पोलिसांकडे पहिली तक्रार नागपूर विभागातून दाखल झाली. या साठी एक समिती स्थापन करण्यात आली. उपसंचालक उल्हास नरड यांच्या नेतृत्वाखालील समितीने २३३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा अहवाल सादर केला. मात्र सायबर पोलिसांनी त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत एकूण १ हजार ८० शिक्षकांपैकी ६३३ जणांच्या नियुक्त्या बोगस असल्याचे समोर आणले. या तपासाने शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे धक्कादायक सत्य समोर आले.या घोटाळ्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्थेचा पाया हादरला आहे.
तपासा दरम्यान वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, आता महत्त्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्रात आणखी मोठी खळबळ उडविणारी घटना म्हणून अजूनही ज्या शिक्षकांनी बनावट कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने शालार्थ आयडी मिळविणाऱ्या ६८० बोगस शिक्षकांवर कारवाई बाकी आहे. या शालार्थ आय डी प्रकरणात आर्थिक व्यवहारांचा मोठा खेळ झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.
या घोटाळ्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे, असल्याचं समोर आले असून विशेष तपास पथकाने मुख्य आरोपी नीलेश वाघमारे याला अटक केली. बोगस शिक्षकांना अटक करणे, भ्रष्टाचाराची साखळी तोडणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आता सरकार आणि शिक्षण विभागाची प्राथमिकता असून हा घोटाळा केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या पवित्रतेवर घाला आहे. हा घोटाळा फक्त नागपूर विभागापुरताच मर्यादित नाही… तर या घोटाळ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला पोखरलंय… त्यामुळे फक्त १ हजार ८० शालार्थ आयडीपैकी ६८० बोगस आयडी आढळले असतील तर राज्यभरात शालार्थ आयडीच्या माध्यमातून किती बोगस शिक्षक असतील? याची कल्पनाच न केलेली बरी…
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

