बोदवळमुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगरात निवडणूकीची माहिती न देण्याऱ्या प्रशासनाच्या विरोधात पत्रकारांचा बहिष्कार

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश वखारे हे प्रसार माध्यमांना तसेच पत्रकार बांधवांना कोणत्याच प्रकारची निवडणूक प्रक्रिये विषयक माहिती पुरवित नसल्याने स्थानिक पत्रकारांनी त्यांच्या आयोजित पत्रकार परिषदेला बहिष्कार टाकला.

मुक्ताईनगर विधान मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना तसेच पत्रकार बांधवांना कोणत्याच प्रकारची निवडणूक प्रक्रिये विषयक माहिती पुरवित नसल्याने आजपर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करेपर्यंत त्याचप्रमाणे उमेदवारांच्या माघारीपर्यंत चिन्ह वाटप करणे संदर्भातील कोणत्याच टप्प्यातील माहिती अधिकृतरित्या पत्रकारांना बोलवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यातर्फे देण्यात आलेली नाही. उलट माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे गेले असता आमच्या पत्रकार बांधवांना दोन दोन तास उभे करून सुद्धा माहिती देत नाहीत.

बाहेर नोटीस लावण्यात येईल तिथून माहिती घ्यावी असा सल्ला निवडणूक विभागातर्फे देण्यात येतो. सदर माहिती रात्री दहा वाजेपर्यंतही संबंधित विभागातर्फे देण्यात येत नाही. निवडणूक विभागातर्फे मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतु त्याचा कोणत्याच प्रकारचा फायदा पत्रकारांना आजपर्यंत झालेला नाही. तसेच अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातर्फे मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवर मुक्ताईनगर तालुक्याच्या पत्रकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे सर्वांच्या एकमताने बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेला मुक्ताईनगर तालुक्यातील एकही पत्रकार बांधव उपस्थित नव्हता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!