सावदा येथे ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | भगवान परशुराम जयंती सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे मोठ्य उत्साहात साजरी केली गेली. विष्णुचा सहावा अवतार मानले गेलेले भगवान परशुराम हे ब्राह्मण समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी विशेषतः उत्तर भारतात बहुतांश लोकांचे आराध्य दैवत मानले जाते. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रदोष काळात जयंती साजरी केली जाते. यंदा देखील सावदा येथे ब्राह्मण हितावर्धिनी तर्फे भगवान परशुरामांची दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत कुळकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रसाद वाटप केले गेले.
यावेळी हितवर्धिनीचे अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी भगवान परशुरामाची मातृ आणि पितृ भक्ती अंगीकारून शिस्त प्रियता पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तर प्रशांत कुळकर्णी यांनी समाजात आलेली मरगळ दूर सारून जिद्दीने पुढे जाण्याची गरज बोलून दाखविली.नयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कुळकर्णी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सानिका मटकरी, श्रीकांत मटकरी, प्रदीप कुळकर्णी, निलेश कुळकर्णी, दिपक कुळकर्णी, कविता सकळकळे, अपूर्वा कुळकर्णी, फैजपूर येथील अनिकेत कुळकर्णी, तिवारी, मुन्ना कुळकर्णी, सतीश जोशी, रवींद्र कुळकर्णी यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने ब्रह्मवृंद उपस्थित होते.