भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

ब्रेकिंग : सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, १० राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या असून मध्यरात्री नंतर राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं. यात दहा राज्यातील राज्यपालांच्या फेरनियुक्त्या व बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्यात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

सी.पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल असून त्यांची महाराष्ट्राच्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे जागी झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा पदभार संतोषकुमार गंगवार यांचे कडे सोपविला गेला आहे.

राज्याचे नवे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बद्दल थोडक्यात…

सी.पी राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे असून त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. त्यांचा साधारण शेतकरी कुटुंबात जन्म झाला असून वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करीत आहेत .ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतें.कोइंमतुर लोकसभा मतदार संघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांच्या वडिलांचे नाव  सी.के. पोन्नूसामी व आईचे नाव  के. जानकी आहे.त्यांची शैक्षणिक पात्रता BACHELOR OF BUSINESS ADMINISTRATION  असून ते ‘सीपीआर’  च्या नावाने प्रसिद्ध आहेत.

कोणत्या राज्याचे कोण आहेत नवीन राज्यपाल
सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र

हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान

संतोषकुमार गंगवार – झारखंड

रमण डेका – छत्तीसगड

सी. एच. विजयशंकर – मेघालय

ओमप्रकाश माथूर – सिक्किम

गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड

लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)

जिष्णू देव वर्मा – तेलंगण

के. कैलाशनाथन – पुदुच्चेरी (उप राज्यपाल)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!