Breaking: सावदा भाजपा शहराध्यक्षासह गो-रक्षकांवर जीवघेणा हल्ला, शहरात तणावपूर्ण शांतता
सावदा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षासह पाच ते सहा गोरक्षकांवर आज सोमवारी रात्री ९ ते ९.१५ दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
प्राथमिक माहिती नुसार आज दि,२८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ९.१५ येथील स्वामींनारायन नगर ते साळीबाग नजीक च्या परिसरात समाजकंटकांनी भाजपचे शहर अध्यक्ष जे. के. भारंबे सह आणखी पाच ते सहा जनांनी गो तस्करी करणारे वाहन पकडल्याने त्या सात ते आठ गो रक्षकांवर तलवारीने रॉळ व लाथा बुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केला यात ते गंभिर जखमी झाले असून जखमींना फैजपूर येथील डॉ खाचणे यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.
दरम्यान सावदा शहरात फैजपूर, मुक्ताईनगर,यावल, आदी ठिकाणाहून पोलीस मागविण्यात आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे, पोलीस अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले असून सावदयाला जिल्हा पोलिसअधीक्षक एम राजकुमार, Dysp सोनवणे, dysp सोमनाथ वाघचावरे यांनी भेट दिली ,सपोनि जालिंदर पळे हे कारवाई करीत आहेत. सदरील घटनेचा निषेध म्हणून उद्या मंगळवार रोजी सावदा बंद ची हाक देण्यात आली आहे.