भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

ब्रेकिंग : ३७ सापळा कारवाईत ६० लाचखोर सरकारी अधिकारी व खाजगी इसम एसीबी च्या जाळ्यात

जळगाव लाच लुचपत विभागाच्या यशस्वी कारवाया

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या सन २०२४ मध्ये जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकुण ३७ सापळा कारवाई करण्यात आल्या असून एकुण ६० लाच घेणाऱ्या सरकारी अधिकारी व खाजगी व्यक्तीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या संपुर्ण ६० संशयित आरोपीमध्ये जळगांव घटकाकडील वर्ग १ चे ४, वर्ग २ चे १, वर्ग ३ चे ३०, वर्ग ४ चे ६, इतर लोकसेवक ६ व खाजगी इसम १३ यांचा समावेश आहे.

सन २०२४ या वर्षभरात जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडून विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात आली. यात महसुल विभागात ७ कारवाई मध्ये ११, जिल्हापरिषद विभागात ७ कारवाई मध्ये १४ संशयित आरोपी, पोलीस विभागात ५ कारवाई मध्ये ८, विज वितरण विभागात ४ कारवाई मध्ये ८, उद्योग उर्जा व कामगार विभागात २ कारवाई मध्ये २, शिक्षण विभागात २ कारवाई मध्ये २, सरपंच २ कारवाई मध्ये ५, इतर लोकसेवक २ कारवाई मध्ये २, खाजगी २ कारवाई मध्ये २ इसम, आर.टी.ओ विभागात १ कारवाई मध्ये २ संशयित, दारुबंदी विभाग १ कारवाई मध्ये २, म.न.पा. विभागात १ कारवाई मध्ये १, बी.एच.आर.पतसंस्था १ कारवाई मध्ये २ आरोपी अशा विविध विभागात कारवाई केली आहे. अशा प्रकारे एकुण ३७ सापळा कारवाई मध्ये ६० संशयित आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.

या पूर्वी सन २०२३ च्या मध्ये ३२ गुन्हयांमध्ये ५१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असुन सन २०२४ मध्ये ३७ गुन्हयामध्ये ६० आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ च्या तुलनेत सन २०२४ मध्ये अधिक ०५ ने वाढ झाली आहे.

सदरची कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जळगांव घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. कार्यालयीन वेळेनंतर वा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत व तकारी बाबत माहीती पाहीजे असल्यास खालील नमुद मोबाईल कमांक व दूरध्वनीवर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असुन लॉन्ड लाईन क्रमांक ०२५७  २२३५४७७ सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तकारी संबंधी नागरीकांनी संपर्क साधावा. असे पोलिस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकूर, लाच लुचपत प्रतिबंधक विभागा जळगाव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!