ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान ६४ लाखांची रोख रक्कम जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. त्यात लाखो रुपये जप्तीच्या घटना सुरू आहेत. त्यातच जळगाव मधून अक घटना समोर आली. जळगाव मध्ये नाकाबंदी दरम्यान आकाशवाणी चौकात भरारी पथकाने एका कार मधून ६३ लाख ६८ हजार ९४८ रुपये रोकड गुरूवार रोजी जप्त केली. (cash seized jalgaon)
जळगाव Jalgaon येथील भरारी पथकास सदर कार बाबत माहिती मिळाल्याने जळगाव येथील आकाशवाणी चौकात एम एच १९ ई ए ९१७३ या क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात राकेश ए जैन. नयनतारा अपार्टमेंट ,कला भवन समोर सिंधी कॉलनी रस्ता. यांचे कडे ६३ लाख ६८ हजार ९४८ रुपयांची रोख रक्कम आढळल्याने मोठी खळबळ उडाली. सदर रक्कम ई एस एम एस प्रणाली नुसार जिल्हा तक्रार निवारण समिती समोर सादर करण्यात येऊन पेटीत सीलबंद कोषागरात ठेवण्यात आली आहे .
तसेच संबंधित व्यक्तीला आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. त्या व्यक्तीला या रक्कमे बाबत हिशोब द्यावा लागणार असून त्या बाबत चौकशी केली जाणार आहे . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली