ब्रेकिंग : सर्वसामान्यांना धक्का ; गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज १ मार्च, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का धक्का दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या (बजेट) दिवशी सरकारने दिलेली सवलत आज मागे घेण्यात आली.
१ मार्च २०२५ शनिवार पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर सहा रुपयांनी वाढला आहे मात्र घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसच्या किमती जैसे थे आहेत.
ऐन होळी आणि रमजानच्या महिन्यात तेल व्यावसायिक कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा भाव वाढविल्याने ग्राहकांना महागड्या गॅस सिलिंडरचा सर्वसामान्यांना दणका बसला आहे. केवळ हॉटेल व्यावसायिकांचा नाही तर ग्राहकांच्या खिशालाही महागाईची झळ बसणार आहे. मार्च महिन्यात अनेक सण साजरे केले जातात.

होळी आणि ईदचा (रमजान) सणही याच महिन्यात आहे. रमजान उद्या २ मार्चपासून सुरू होईल तर याच सध्या लग्नसराईचा हंगामही सुरु आहे. अशा स्थितीत, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती एक दोन नव्हे तर तब्बल सहा रुपयांनी वाढवून ग्राहकांचं चांगलंच टेन्शन वाढवलं आहे.