भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : भरधाव डंपरने चिमुरड्याला चिरडले, चिमुरडा जागीच ठार, संतप्त नागरिकांनी डंपर पेटविला

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मामा सोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा भरदार डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर सोबत असलेली त्यांची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे आज बुधवार २५ डिसेंबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास कालिंका माता चौकात ही घटना घडली .या घटनेने संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, योजेस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजेस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!